राज्यात निवडणूक काळात 500 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त:वाहन तपासणीसाठी 6,000 पथकांचा खडा पहारा

6 days ago 2
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक विभागाकाकडून तब्बल 6 हजार स्थिर व भरारी पथके स्थापन केली असून या पथकांनी आता पर्यंत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये 500 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. आता पुढील पाच दिवसांत या पथकांचा जिल्हयाच्या सिमेवर खडा पहारा असणार आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुक होत असून त्यासाठी 4100 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून आदर्श अचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासकिय पातळीवरून लक्ष ठेवले जात आहे. यासाठी क विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) तैनात आहेत. या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 6 हजार पथके आणि 19 अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या सिमेवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असून या शिवाय जिल्हयात भरारी पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून जिल्हयातून बाहेर जाणारी तसेच जिल्हयात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या शिवाय विविध पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतात; त्यांचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची देखील तपासणी केली जात आहे. राज्यात स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये महसुल कर्मचाऱ्यांसोबत पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यभरात आता पर्यंत या पथकांकडून तब्बल 500 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली असून यामध्ये रोख रक्कम, मौल्यवान दागिन्यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले दरम्यान, आता पुढील चार दिवसांत अधिक सतर्क राहण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले असून तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. वाहनांमध्ये रोख रक्कम, पैसा, दारू, मौल्यवान वस्तू आढळून आल्यास जप्त करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे निवडणुक विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article