राणी लंके यांना आमदारकीची ओवाळणी द्यावी:महाआघाडीला दृष्ट लावण्याचे पाप कार्लेंनी केले : बाळासाहेब हराळ
2 hours ago
1
सतरा वर्षांपूर्वी २००७ साली राज्यात पहिल्यांदा नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्षे लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या मित्राने केले असल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केली. त्यांचा रोख विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर होता. मतदारांनी भावनेच्या भरात त्याच्या नादी लागू नये. नगर तालुक्याची लेक असलेल्या राणी लंके यांना मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या, असे आवाहन हराळ यांनी केले. पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील मविआच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारासाठी सारोळा कासार (ता. नगर) येथे आयोजित सभेत हराळ बोलत होते. उमेदवार राणी लंके, जि. प. चे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, माधवराव लामखडे, नंदा शेंडगे, सुवर्णा धाडगे यावेळी उपस्थित होते. यापूर्वी २००९ व २०१४ च्या निवडणुकांमध्ये मी आणि माधवराव लामखडे यांनी डोकं लावलं होत. त्यामुळे आमच्या मित्राला सांगितले, कुठही डोकं लावण्यात अर्थ नाही, तरी त्याने लावलेच, असे प्रताप शेळके यांनी सांगितले. उमेदवार राणी लंके म्हणाल्या, मी आमदार झाल्यावर विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी देईल, असे सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)