आज सोमवारी (दि.१८ नोव्हेंबर) भारतीय शेअर बाजारात सलग सातव्या सत्रांत घसरण कायम राहिली.(file photo)
Published on
:
18 Nov 2024, 6:13 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:13 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि विदेशी संस्था गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्रीचा मारा आदींमुळे भारतीय शेअर बाजारात सलग सातव्या सत्रांत घसरण कायम आहे. सोमवारी (दि.१८) सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० हुन अधिक अंकांनी घसरून ७७,२०० च्या खाली आला. तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २३,४०० वर व्यवहार करत आहे. आयटी शेअर्समध्ये अधिक घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, रिलायन्स, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी, अमेरिकेतील मजबूत आर्थिक वाढीमुळे व्याजदर कमी करण्याची घाई नसल्याचे सूचित केले आहे. त्यांच्या टिपण्णीनंतर आयटी शेअर्स घसरले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक २.७ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्के घसरला आहे. निफ्टी आयटीवर विप्रो, टीसीएस, LTIMindtree, इन्फोसिस हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के घसरले. टेक महिंद्राचा शेअर्स २ टक्के खाली आला.