Published on
:
18 Nov 2024, 8:25 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:25 am
जळगाव |जळगाव जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज जळगावातील मेहरुण परिसरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. निवडणुक काळात गुन्हेगारांना शस्त्र कुठून मिळत आहे. शस्र पुरवठा करणारा कोण आहे? याचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.
आज दि. 18 रोजी अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाला आहे. गोळीबार घरावर झाल्यामुळे अपक्ष उमेदवाराला कोणतीही इजा झालेली नाही मात्र आरोपी थेट घरापर्यंत येऊन गोळीबार करून जात आहे. यामुळे पोलिस यंत्रणेचा कोणताही धाक गुन्हेगारांवर राहिलेला दिसून येत नाहीये. गुन्हेगारांना सहज शस्त्र मिळत असल्याने त्यांना गुन्हे करण्यास हिम्मत मिळत आहे. अपक्ष उमेदवारावर झालेल्या या फायरिंग वरुन असेच दिसून येते की शस्त्र गुन्हेगारांना सहज जळगावात उपलब्ध होत आहे .
घटना झाल्यावर पोलीस यंत्रणेला संपूर्ण पणे जाग येते. एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही. या ठिकाणी एमआयडीसी परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचा ऊत आलेला आहे. अवैध प्रकारची दारू असो, अवैध प्रकारचे गॅस भरण्याचे प्रकार असो, सट्टा मटका यासारखे अनेक अवैध धंदे एमआयडीसी परिसरात मोठ्या जोमाने सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येते नाही.