हिंगोली जिल्ह्यात नऊ लाख 12 हजार मतदारांना पोलचिठ्ठीचे वाटप:जिल्हाधिकारी गोयल यांची माहिती
2 hours ago
1
जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदाराला मतदार चिट्ठी (पोलचीट) पोहचवण्याची जबाबदारी 1 हजार 15 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठयांचे वाटप झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. वसमत विधानसभा मतदार संघात 327, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 345 आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी 343 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून या ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 9 लक्ष 84 हजार 764 मतदारांपैकी 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 20 हजार 765 मतदारांपैकी 2 लक्ष 97 हजार 712 ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. कळमनुरी 3 लक्ष 30 हजार 686 मतदारांपैकी 3 लक्ष 6 हजार 449 तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 33 हजार 313 मतदारांपैकी 3 लक्ष 8 हजार 650 जणांपर्यंत ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ओळखचिठ्ठ्या वाटपाची एकूण टक्केवारी 92.69 अशी आहे. उर्वरीत ओळखचिठ्ठ्या वाटपाची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूकविषयक बैठका, प्रशिक्षण तसेच इतर कामे करण्यासाठी विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके 24 तास कार्यरत आहेत. तसेच महामार्ग वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांकडून बैठका, जाहीर सभा, कॉर्नर सभा आयोजित करताना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन 24 तास नजर ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)