Published on
:
18 Nov 2024, 6:12 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:12 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणातील दोषी बलवंत सिंग राजोआना याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींसमोर ठेवण्यात यावा. यावर दोन आठवड्यांत विचार करण्यात यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१८) राष्ट्रपतींच्या सचिवांना केली आहे.
पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची १९९५ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणातील दोषी बलवंत सिंग राजोआना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. त्याच्या दयेच्या अर्जावर आजपासून दोन आठवड्यांत विचार करण्याची विनंती न्यायालयाने राष्ट्रपतींना केली आहे.
Supreme Court asks the secretary to the President of India to place the matter of mercy petition of death-row prisoner Balwant Singh Rajoana before the President with a request to consider it within two weeks.
Rajoana was awarded death sentence for assassination of the then… pic.twitter.com/ci3qkHCBR0
— ANI (@ANI) November 18, 2024