पदरात पाच मुलं असताना पुतण्यासह अफेअर करणं एका महिलेला चांगलचं महाग पडलं आहे. महिलेच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती सासू-सासऱ्यांच्या घरी पाच मुलांसह राहत होती. शेजारच्या घरात पुतण्या रहायचा. त्याच सुद्घा लग्न झालेलं. त्याला दोन मुलं आहेत. पुतण्यासोबत अफेअर करणं काकीला महाग पडलं. पुतण्याने एकदिवस तिला परपुरुषासोबत बघितलं. रात्री तो काकीच्या घरी गेला आणि चाकूने गळा कापून तिची हत्या केली. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण आहे.
हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुतण्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याला अटक करुन पुढील तपास सुरु केलाय. कोतवाली क्षेत्रातील एका गावातील हे प्रकरण आहे. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्याची 32 वर्षीय पत्नी पाच मुलांसह सासू-सासऱ्यांकडे रहायची. आरोपी शनिवारी रात्री घरी घुसला व चाकूने भोसकून त्याने काकीची हत्या केली. आरोपीच नाव शाहरुख असून तो 28 वर्षांचा आहे. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
सासऱ्याच्या जमिनीवर कुटुंबातील अन्य लोकांची नजर
पोलिसांनी सांगितलं की, विधवा महिलेचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याच तपासात समोर आलं आहे. या महिलेचे गावातील आणखी एक व्यक्ती सोबत संबंध सूर जुळले. मृत महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, महिलेच्या सासऱ्यांच्या नावावर कोट्यवधीची जमीन आहे. पतीच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या जमिनीवर कुटुंबातील अन्य लोकांची नजर होती. ते सासऱ्यांना विश्वासात घेऊन जमीन आपल्या नावावर करण्याच्या तयारीत होते.
हीच गोष्ट त्याला खटकली
महिलेचे लग्न 17 वर्षांपूर्वी झालं होतं. पाच वर्षांपूर्वी आजारपणामुळे महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. शेजारी राहणारा पुतण्या शाहरुखच (28) महिलेच्या घरी येणं-जाणं वाढलं. दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यातून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघांच्या संबंधांची चर्चा सुरु झालेली. महिलेने अचानक पुण्याकडे दुर्लक्ष सुरु केलं. हीच गोष्ट त्याला खटकली. त्यातून हे भयानक हत्याकांड घडलं.