सिंदखेड राजामध्ये NCP चा शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा:प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी घेतला निर्णय; राजकीय वर्तुळात चर्चा

3 hours ago 1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी या मतदारसंघातून काढता पाय का घेतला? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली होती. तर या ठिकाणी शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना संधी दिली होती. एकाच मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार दिल्यामुळे येथे मोठा पेच निर्माण झाला होता. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांनी मोठे मन करत याठिकाणी शशिकांत शिंदे या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता या मतदारसंघात खेडेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्याशी होईल. महायुतीचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, "राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, रिपाई (आ) व अन्य घटक पक्ष मिळून "महायुती" म्हणून, सर्व पक्ष एकत्रित, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिंदखेड राजा मतदार संघातून मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदार संघात शिवसेना पक्षातर्फे श्री. शशिकांत खेडेकर हे पण उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे यांच्या सूचनेनेनुसार पक्षाकडून सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचे (महायुतीचे) अधिकृत उमेदवार श्री. शशिकांत खेडेकर यांना पाठींबा जाहीर करण्यात येत आहे", असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मनोज कायंदे यांच्या माघारीमुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढल्याची चर्चा आहे. हे ही वाचा... केलंय काम भारी लुटली तिजोरी:उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका; म्हणाले - मला कोणत्याही स्थितीत या गद्दारांना गाडायचे आहे मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार काम भारी केल्याची जाहिरातबाजी करत आहे. पण त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे नव्हे तर त्याची तिजोरी लुटण्याचे एकमेव काम भारी केले आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article