Published on
:
18 Nov 2024, 8:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील गृह खरेदीदारांच्या फसवणूक प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना आज (दि. १८) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या प्रकरणी गौतम गंभीरच्या दोषमुक्तविरोधातील आदेशाला स्थगिती देत फसवणुकीचा खटला पुन्हा सुरू करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
गौतम गंभीरने उच्च न्यायालयात धाव घेऊन सत्र न्यायालयाच्या फसवणुकीच्या खटल्यातून मुक्त करण्याचा सत्र न्यायालयाच्या आदेश रद्द ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यालयाचा आदेशाला स्थगिती दिली आहे.
Delhi High Court stays the trial court order against the discharge of former cricketer Gautam Gambhir in a case of cheating with home buyers.
Magistrate Court had discharged Gambhir. However, the session court had set aside the said order.
(File photo) pic.twitter.com/z5XkWlJ8cz
— ANI (@ANI) November 18, 2024रुद्र बिल्डवेल, एचआर इन्फ्रासिटी आणि यूएम आर्किटेक्चर्स या गृहनिर्माण कंपन्यांनी घर खरेदीदारांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित कंपन्या आणि संचालकांवर फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खटलाही दाखल करण्यात आला. रुद्र बिल्डवेल कंपनीचा गौतम गंभीर हा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा तक्रारीत समावेश होता. मात्र सत्र न्यायालयाने गौतम गंभीर यांच्यासह अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर गृहखरेदीदारांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती.