Published on
:
18 Nov 2024, 8:45 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:45 am
परभणी : मागील १५ दिवसांत शिगेला गेलेला प्रचाराचा धुराळा सोमवारी सायंकाळी थंडावत असल्याने अवघे काही तास शिल्लक असल्याने लखतीतील प्रमुख उमेदवारांनी रात्रीचा दिवस सुरू केला आहे. या निवडणुकीच्या निमीताने जिल्ह्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे सताकारण केलेल्या दिग्गज आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काहींसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथून पालधून पहली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात भेट वाटणाऱ्या लढती अंतिम टप्प्यात निवडणुकीचे स्वरूप बदलणाऱ्या उरल्या आहेत. पंधरा दिवसाच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांसह प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जातांना उमेदवारांनी मोठे प्रयत्न करीत प्रचाराचा टप्पा पार पाडला. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभांतून शक्तिप्रदर्शन करीत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला अंतीम टप्प्यात शनिवारपासून पदयात्रा व रॅलीने शक्तिप्रदर्शन करीत मतदारांपर्यंत अखेरचा संदेश देण्याचा प्रयत्न करताना रात्रीच्या महामोडीही मोठ्या प्रमाणावर पडवून आणण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर लक्ष्मीअस्त्राचा वापर करण्याऐवजी तीन दिवस अगोदरपासूनच हे अस्व संबंधित घटकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्नही केला आहे.
त्यात काही उमेदवार यशस्वीही झाले व्यहेत. अखेरचे दोन दिवस याच घडामोडींवर भर राहणार आहे. या पाश्र्वभूमीवर ही निवडणूक दिग्गज राजकारण्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्रभाव क्षेत्रातील मतविभाजन टाळण्याबरोबरच काही भागात मतविभाजन होण्यासाठी देखील उमेदवार प्रयत्न करू लागले आहेत. परभणी मतदारसंघाचे दहा वर्ष प्रतिनिधीत्व करणारे महाविकास आघाडीचे आ.डॉ. राहुल पाटील हे इंटूटीक साधण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करू लागले आहेत.
महायुतीचे आनंद भरोसे यांनी त्यांच्यासमोर केलेले कडवे आव्हान तसेच हिंदू व मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचा दोघांकडूनही होणारा प्रयत्न महत्वपूर्ण ठरणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला टिकविण्याचे आव्हान डॉ. पाटील यांच्यासमोर आहे. महाविकास आघाडीच्या मुस्लीम बोटवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले असले तरी निवडणूक रिंगणातील मुस्लीम उमेदवारांकडून होणारे धुव्रीकरण राळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्पायवेळी हिंदू बोटबँक शाबीत ठेवण्यासाठी भरोसेंना प्रवत्नांची शिकस्त करावी लागत आहे. रिंगणातील अन्य उमेदवारांकडून होणाऱ्या मतविभाजनामुळे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पाथरी मतदारसंघ यावेळी लक्षवेधी लढतीचा ठरला आहे. दिग्गज मंडळी या मतदारसंघात रिंगणात उतरलेली असल्याने बहुरंगी लढतीचे चित्र समोर येत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून जिल्ल्याच्या राजकारणात वर्चस्व मिळविणारे व ९ निवडणूकीचा प्रदिर्भ अनुभव पाठिशी असलेले आ. सुरेश वरपुडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणू रिंगणात घेतलेली उडी महाविकास आपाडीसाठी थोकादायक ठरण्याची शक्यता बर्तविली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.राजेश विटेकर है प्रथमच विधानसभेच्या निवडणूकीत रिंगणात असून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय रासपकडून सईद खान व अपक्ष उमेदवार माधवराव फडे या दोघांनीही प्रचारात लक्षवेधक आघाडी घेतल्याने येथील लखत मतविभाजानाच्या गणितावर अवलंबून राहणार आहे.
तिरंगी लढतीत मतविभाजन अटळ
गंगारखेड व जिंतूर मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. महाविकास आघाडी व महायुती विरोधात दोन्ही मतदारसंघात बंचित बहुजन आषाडीच्या रूपाने दिग्गजांनी निर्माण केलेले आव्हान या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरविणारे ठरेल. चुरशीच्या लडतीत या दोन्ही मतदारसंघातील चित्र नेमके काय असू शकेल हे जातीपातीच्या मतदानावरच अवलंबून रा हणार आहे. माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांचे कार्यक्षेत्र राहिलेल्या जिंतूरमध्ये आ. मेघना बोर्डीकर दुसप्यांदा रिंगणात असताना पारंपारीक प्रतिस्पर्धी माजी आ. विजय भांबळे यांच्याशी मागील निवडणूकीप्रमाणे घेट लडत होईल, असा व्होरा सुरुवातीच्या टप्प्यात असताना वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे यांनी केलेला लक्षवेधक प्रवेश व प्रच ारात घेतलेली आघाडी यामुळे पाठिकाणी छिरंगी लढत होईल.
गंगाखेडमधेही विद्यमान आ. रत्नाकर गुट्टे गांच्यासमोर महाविकास आघाडीचे विशाल कदम यांनी उभ्या केलेल्या आव्हानाबरोबरच माजी आ. सिताराम घनदाट यांनी संचित बहुजन आघाडीकडून रिंगणात येत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे याही मतदारसंघात तिरंगी लढत आहे. विशेषतः या दोन्ही मतदारसंघात ओबीसीचे मतदान निर्णायक असल्याने ही मते कोणाच्या पारड्यात पडतात यावर विजयाचे गणिते अवलंबून राहणार आहेत. आ. गुट्टे व आ. मेघना बोर्डीकर या दोघांबरीवरच भांबळे, कदम, घनदाट नागरे या सर्वांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेबरोबरच अस्तित्वाची लढाई ठरली आहे.