लक्ष्मण हाकेंनी खरेच मद्यप्राशन केले होते का?:वैद्यकीय चाचणीचा प्राथमिक निष्कर्ष निगेटिव्ह; रक्ताचे नमुणे प्रयोगशाळेत पाठवले

2 hours ago 1
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा आरोप आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. पण आता लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल पुढे आला असून, त्यात हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा कथितपणे झिंगत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी मराठा आरक्षण समर्थक तरुणांनी हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी हाके यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून दमदाटी केल्याचाही आरोप आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. सोमवारी रात्री पुण्यात ही घटना घडली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या हाके यांनी मद्यपान केले नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी काढल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पण यासंबंधीची अधिक खातरजमा करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुणे वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्याचा अहवाल पुढील एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. काय घडले होते पुण्यात? यासंबंधीच्या वृत्तानुसार, लक्ष्मण हाके पुण्यातील एका टेकडीवर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत बियर पित बसले होते. यावेळी तेथून जाणाऱ्या काही मराठा आंदोलकांची त्यांच्यावर नजर पडली. त्यावेळी त्यांनी हाके यांना त्याचा जाब विचारला. तसेच तुम्ही राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर खालच्या पातळीवरची टीका केली? असा प्रश्नही केला. त्यावर लक्ष्मण हाके यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. यासंबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरुण लक्ष्मण हाके यांना धरून घेऊन जाताना दिसून येत आहेत. यावेळी काहीजण त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचीही मागणी करताना दिसून येत आहेत. या घटनेमुळे लक्ष्मण हाके यांच्या सार्वजनिक ठिकाणावरील व्यवहारावर टीका केली जात असतानाच आता त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपल्यावरील कथित हल्ल्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. खाली पाहा व्हिडिओ हे कायद्याचे राज्य; इथे राजेशाही कधीच संपली:आम्ही कुणालाही राजा मानत नाही, लक्ष्मण हाके यांचा संभाजीराजे छत्रपतींवर घणाघात पुणे - हे राज्य कायद्याचे राज्य आहे. इथे लोकशाही आहे. राजेशाही कधीच संपली आहे. त्यामुळे आम्ही असले कोणाला मानत नाही, महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरती हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो?, असा सवाल करत ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article