लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी:अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजी ब्रिगेडचे हाकेना तिसऱ्यांदा चॅलेंज

2 hours ago 2
लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले असून माध्यमांसमोर वायफळ व फालतू बडबड करीत आहेत. स्वतः विद्वान असल्याचा आणि आरक्षणाचा अभ्यास असल्याचा भास करून, आरक्षणाविषयी चुकीची, खोटी व असंविधानिक माहिती देत आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी केली आहे. डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले, समाजाची दिशाभूल करीत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी स्फोटक वक्तव्य करीत आहेत. वास्तवात त्यांचा कुठलाही आरक्षणाचा सखोल अभ्यास नसताना त्यांनी मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे समर्थक किंवा आरक्षण अभ्यासक यांनी आरक्षणासंदर्भात लाईव्ह चर्चेला यावे असे काही महिन्यापूर्वी ओपन चॅलेंज दिले होते. ते मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता व आरक्षणाचा अभ्यासक या नात्याने ते चॅलेंज स्वीकारले होते. पण त्यानंतर काही दिवस लक्ष्मण हाके आपले पितळ उघडे पडेल या भीतीने प्रसार प्रसारमाध्यमातून गायब झाले होते. परत काही दिवसानंतर त्यांनी फालतू बडबड सुरू केली होती. तेव्हा पण त्यांचे दुसऱ्यांदा चॅलेंज स्वीकारून त्यांना लाईव्ह चर्चेसाठी चॅलेंज केलं होतं. तेव्हाही ते परत घाबरून प्रसारमाध्यमातून गायब झाले होते. डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले, मुळात लक्ष्मण हाकेची कुवत व लायकी नसताना ते सुपारी घेऊन, स्वतःच्या स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी वाटेल तसे चुकीचे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यांना प्रसिद्धीची नशा चढली आहे. अशी माणसं समाजाला घातक असतात. आता ते वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत, वायफळ आणि फालतू बडबड करीत आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. आमचे त्यांना तिसऱ्यांदा चॅलेंज आहे की त्यांनी आरक्षणावर आमच्यासोबत लाईव्ह चर्चा करावी. जनतेलाही कळू द्या. खरं काय, खोटं काय, कोण चुकीच, कोण बरोबर. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. हिम्मत असेल तर लाईव्ह चर्चेला या अन्यथा फालतू आणि बाष्कळ बडबड त्वरित बंद करा. नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते व आरक्षणाचे अभ्यासक डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article