लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं:मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल

2 hours ago 1
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडकी बहिण’ योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजे 7 आक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषद मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा धादांत खोटा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहिण योजना सुरू आहे. राऊतांचे वक्तव्य काय? संजय राऊत म्हणाले होते की, योजना संपूर्ण देशात कुठेही यशस्वी होत नाहीत. हा संपूर्ण राजकीय खेळ आहे. तुम्ही मध्य प्रदेशात जा आणि योजना सुरू झाली की नाही ते पहा. तेथे वित्त सचिवांचा आदेश काय? ही अतिशय अवैध योजना आहे, जी फलदायी होणार नाही. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही, अशी चिंता संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे. काम झाले, 40% कमिशन घेतले, 20%. त्यांना मोबदला दिला जात नाही. ते सर्व कंत्राटदार मंत्रालयात आंदोलन करणार असून, लाडली बहिण योजना आणखी एक महिना चालवणार आहेत. दिवाळीत सरकारी कर्मचारी, पोलिस, शिक्षक यांचा पगार होणार नाही. लाडली बहिण योजनेच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article