लाडकी बहिण योजनेचे नियम टीव्ही, वर्तमान पत्रातून सांगावेत असा सल्ला छगन भुजबळ यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.Pudhari
Published on
:
05 Feb 2025, 4:04 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:04 am
नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयासाठी गेमचेंजर ठरली आहे. मात्र या योजनेबाबत सुरू झालेल्या चर्चा संभ्रम निर्माण करणाऱ्या ठरत असल्याने या योजनेबाबतचे नियम टीव्हीवर येऊ द्यावेत. वर्तमान पत्रातून सांगावेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.
आ. भुजबळांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या महिलांना वाहनामध्ये पेट्रोलसाठी मासिक दहा हजार रुपये लागतं असतील त्यांना लाडक्या बहीण योजनेचा काय उपयोग? शासनाचे दीड हजार रुपये घेवून काय करायचे आहे. योजनेची मदत गरीबांसाठी आहे. घरकाम, शेतकाम तसेच इतर काम करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. योजनेबाबत वांरवार संभ्रम निर्माण होत असल्याने ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत. त्यांची पडताळणी सुरु असल्याबाबत विचारले असते त्यांनी उत्तर दिले. योजनेबाबत सरकारचे काय नियम असतील ते विविध माध्यमांतून समोर आले पाहिजे. नियमात बसतील त्यांनी मदत घ्यावी, नियमात जे बसत नाहीत त्यांनी मदत सोडावी, असे सांगताना वर्तमानपत्रात जाहिरात देवून नियमांचा खुलासा करता येईल; मात्र ते काही कुणी करत नाही, असे भुजबळ म्हणाले. आपल्याला राज्यपालपदाची आॉफर नसल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळांकडून मुंडेंची पाठराखण
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला आहे. मात्र छगन भुजबळ हे मुंडे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. मुंडे यांच्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेण्यास सक्षम आहेत. ते यासंदर्भात काय करायचे ते करतील. मात्र मंत्री मुंडे यांनी राजीनामा देऊ नये, अशा शब्दात भुजबळ यांनी मुंडे यांची पाठराखण केली आहे.
कामाख्या देवीला रेडे कापले त्याची मंतरलेली शिंगं वर्षा बंगल्याच्या लॉन मध्ये पुरली आहेत, असे तेथील कर्मचारी सांगतात असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर बोलताना भुजबळ यांनी एकनाथ शिंदे गाडू शकतं नाही, कुठं गाडले ते काढावे. गाडण्यासाठी दहा ते बारा माणसे नक्की लागले असतील, असे भुजबळ मिश्किलपणे म्हणाले.