'लाडकी बहीण'वरून महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. (File photo)
Published on
:
18 Nov 2024, 5:45 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:45 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस सत्तेत आल्यास कुटुंबातील एकाच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. पण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एकाच घरातील ३ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देते, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हटले आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट केली आहे.
''कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेचा (लाडकी बहीण योजनेसारखी) काँग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देत आहे. म्हणजे सासू, सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमध्ये वाद विवाद आणि स्पर्धा निर्माण करण्याचीच ही काँग्रेसची योजना आहे,'' असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
कर्नाटक मधील काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना (लाडकी बहिण योजने सारखी) यात कॅांग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देतयं
म्हणजे सासू,सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमधे वाद विवाद व स्पर्धा… pic.twitter.com/OORYWBU1My
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 18, 2024