माजी मंत्री गेहलोत यांची AAP ला सोडचिट्ठी, हाती घेतले कमळ
Published on
:
18 Nov 2024, 7:26 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे माजी मंत्री आणि आप नेते कैलाश गहलोत यांनी आज (दि.१८) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीरपणे प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत गेहलोत यांनी कमळ हातात घेतले. तत्पूर्वी एक दिवस आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील माजी परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्री पदाचा काल (दि.१७) राजीनामा दिला. सोबतच त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे.
आपचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. गेहलोत यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. यानंतर एकच दिवसांत कैलाश गेहलोत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत हाती कमळ घेतले आहे.
Former Delhi Minister and AAP leader Kailash Gahlot joins BJP
'या' कारणामुळे दिली 'आप'ला सोडचिट्ठी
आम आदमी पक्षाने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच आपचा केंद्र सरकारसोबत लढण्यामध्ये जास्त वेळ वाया जात असल्या कारणाने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे. केजरीवाल सरकारच्या काळात यमुना नदी अधिक प्रदूषित झाली असल्याची टीका देखील कैलाश गेहलोत यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.