Published on
:
18 Nov 2024, 9:29 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:29 am
नवी मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. फेस टू फेस जाऊन लोकांची दुःख ऐकणारा, जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री आहे. फक्त टोमणे मारतात, टोमणे मारत मारत अडीच वर्षे घालवली. सगळी कामे रोखली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायचे कार्यकर्ता घरात नाही. लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी आणले. ५ करोड लोकांनी याचा फायदा घेतला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नवी मुंबई येथे महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते (Eknath Shinde) बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळी बंद पडलेली कामे आम्ही पुन्हा सुरु केली. विविध योजना आणल्या. आमची देना बँक आहे, लेना बँक नही, तुम्ही ३ हजारांची योजना आणली आता कुठून आभाळातून पैसे आणणार का ?असा टोला महाविकास आघाडीला लगावला. महायुतीचा जाहीरनामा काढलाय ये तो सिर्फ ट्रेलर है, पिचर अभी बाकी है. बदलापूर ऑन द स्फोट डिसिजन, इकडून वण वाजवायची तिकडून पण वाजवायची. कोणी वाकडी नजर करेल, तर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Polls)
मला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेतला म्हणून टांगा पलटी घोडे फरार झाले. घरी बसणाऱ्यांना सत्ता मिळत नाही. नवी मुंबई महायुतीचा बालेकिल्ला आहे. सर्व शिवसेना भाजपला सांगतो कोणी कोणाची दिशाभूल करेल, आमचा कोणालाही सपोर्ट नाही. फक्त मंदा म्हात्रे यांना सपोर्ट आहे. जे जे मंदा म्हात्रे यांनी सांगितले, ते सगळं मी केले आहे. एकही काम बाकी ठेवले नाही. जे जे मंदा म्हात्रे मागतील ते पुढच्या ५ वर्षात देणार आहे. आपलं ठरलंय मंदा म्हात्रे यांची हॅटट्रिक होणार.