Google Gmail Scam, 2 कोटी लोकांची फसवणूक, ‘या’ 7 टिप्स फॉलो करून सुरक्षित राहा

2 hours ago 1

तुम्हाला वाटते की आलेला ईमेल हा बँकेसारख्या नामांकित आणि जबाबदार संस्थेने पाठविला आहे. पण ईमेल पाठवणाऱ्याचा ईमेल अ‍ॅड्रेस तपासला तर खरा पत्ता समोर येईल. आपल्याला ईमेलमध्ये दिसणारा पत्ता वास्तविक ईमेल आयडीपेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे ईमेल अ‍ॅड्रेस नक्की तपासा. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

Google ने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अमेरिकेत 2.1 कोटी लोकांचे सायबर स्कॅम झाले आहेत. यामध्ये ईमेल, फोन कॉल आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून झालेल्या सायबर फसवणुकीच्या डेटाचा समावेश आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड सुरू असताना स्वत:ला सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आजकाल जवळजवळ सर्व काही ऑनलाईन झाले आहे. मग सायबर क्राईमला बळी पडण्यापासून तुम्ही स्वत:ला कसे वाचवू शकता? हा मोठा प्रश्न आहे.

सर्च इंजिन कंपनी Google तुमच्या सुरक्षेला महत्त्व देते आणि ऑनलाईन फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. Google चे म्हणणे आहे की, स्वतःला वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारची फसवणूक ओळखायला शिकणे. एक तृतीयांश पेक्षा जास्त ऑनलाईन युजर्सना कोणता ईमेल बनावट आहे हे माहित नसते. म्हणूनच Google तुम्हाला जीमेलवरील फेक ईमेल ओळखून ऑनलाईन फसवणुकीपासून स्वत:चा बचाव कसा करता येईल हे सांगत आहे. जाणून घ्या.

ईमेल फ्रॉड कसे टाळावे?

Google च्या जीमेलमध्ये आधीच अशी सुरक्षा आहे जी तुम्हाला ईमेल फ्रॉडपासून वाचवते. परंतु आपण स्वत: काही गोष्टी लक्षात ठेवून देखील सावधगिरी बाळगू शकता.

अनोळखी व्यक्तींच्या ईमेलपासून सावध राहा

एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून तुमची काही वैयक्तिक माहिती मागणारा ईमेल आल्यास तो उघडण्याचीही काळजी घ्या.

घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका

एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला घाईगडबडीत तुमची प्रायव्हेट डिटेल्स विचारत असेल तर अशा ईमेलकडे लक्ष देऊ नका. विशेषत: बँक खाते, घराचा पत्ता किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक अशी माहिती देणे टाळा.

ईमेल अ‍ॅड्रेस तपासा

बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की, ईमेल आपल्या बँकेसारख्या नामांकित आणि जबाबदार संस्थेने पाठविला आहे. पण ईमेल पाठवणाऱ्याचा ईमेल अ‍ॅड्रेस तपासला तर खरा पत्ता समोर येईल. आपल्याला ईमेलमध्ये दिसणारा पत्ता वास्तविक ईमेल आयडीपेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे ईमेल अ‍ॅड्रेस नक्की तपासा.

वेबसाईट डोमेनकडे लक्ष द्या: फसवणूक करणारे अनेकदा मूळ वेबसाईटसारखेच डोमेन नाव वापरतात. उदाहरणार्थ, जर वास्तविक वेबसाईटचे डोमेन @thisisgoodlink.com असेल तर बनावट वेबसाईटचे डोमेन @thisisagoodlink.support असू शकते.

लगेच लिंकवर क्लिक करू नका

ईमेलचा संशय आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करू नका. एकतर तुम्ही थेट वेबसाईटचा पत्ता टाईप करून वेबसाईटवर जा. किंवा सोर्स तपासा.

चुकीचे स्पेलिंग असेल तर सावधान

बनावट ईमेल आता पूर्वीपेक्षा चांगले लिहिले जात असले तरी त्यात कधीकधी चुकीचे शब्द, व्याकरणाच्या चुका किंवा वेगवेगळे फॉन्ट वापरणे यासारख्या त्रुटी असतात. ईमेलमध्ये या गोष्टी दिसल्या तर त्या उघडणे किंवा त्यातील लिंकवर क्लिक करणे टाळा.

पासवर्ड रिसेटकडे दुर्लक्ष करा

अनेकदा फसवणूक करणारे तुम्हाला जीमेल पासवर्ड रिसेट करण्याचे आश्वासन देतात जेणेकरून ते तुमच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करू शकतील. जर तुम्ही पासवर्ड रिसेट रिक्वेस्ट पाठवली नसेल तर असे ईमेल थेट डिलीट करा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article