हिवाळयात दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात थंडी जास्त असते. तसेच त्या ठिकाणी थंडीचा ओघ झपाट्याने वाढत असतो.पण यंदा थंडी येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला, मात्र आता या नोव्हेंबर महिन्यात लोकांना थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या या दिवसात अनेक लोकांना थंड पाण्याने अंघोळ करायची सवय असते. अश्या लोकांना हिवाळ्यात थंडी वाढल्याने गरम पाणी वापरावे लागते. पण गिझर वापरताना खूप खबरदारी घ्यावी लागते. अनेकदा गिझरमुळे अपघातही झाल्याची उदाहरणं समोर आहेत. म्हणूनच गिझर वापरताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
गिझर जास्त वेळ चालू ठेवू नका
थंडीच्या दिवसात तुम्ही गिझर चालू करून काही मिनिटांतच गरम पाणी येऊन येतं. जेणेकरून तुम्ही सहज आंघोळ करू शकाल. पण अनेकदा गिझर चालू केल्यानंतर काही लोकं बराच वेळ बंद करत नाहीत. आणि गिझर चालू राहतो. अशा प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे. काही वेळा गिझरचा स्फोटही होतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही गीझर वापरता. तेव्हा गिझर जास्त वेळा चालू राहणार नाही याची खबरदारी घ्या. गिझर बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्टिफाइड कंपनीकडूनच गिझर खरेदी करा
अनेकदा लोकं काही पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गिझर विकत घेतात. ज्यामुळे पुढे त्यांच्यासाठी खूप धोक्याचे असू शकत. कारण अनेकदा स्थानिक कंपन्यांच्या गिझरमध्ये सुरक्षिततेच्या निकषाची काळजी घेतली जात नाही. आणि असे गिझर खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि अपघात होण्याची भीतीही असते. म्हणूनच गिझर विकत घेताना तुम्ही सर्टिफाइड कंपनीचे गिझर घेत आहात की नाही हे तपासा.
बाथरूममध्ये वरच्या भागात गिझर बसवा
बाथरूममध्ये योग्य ठिकाणी गिझर बसवणं खूप गरजेचं आहे. कारण गिझरचे होणारे अपघात अनेकदा गिझरमध्ये पाणी पडल्याने घडतात. म्हणूनच तुम्ही बाथरूममध्ये वरच्या भागावर गिझर बसावा जिथे पाणी जाऊ शकत नाही.