उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
:
18 Nov 2024, 9:30 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:30 am
चांदवड(जि. नाशिक) : कांद्यावरील निर्यातबंदीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे आता ताकही फुंकून पीत आहोत. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्याची अवेळी अचानक कधीही निर्यातबंदी होणार नाही. यातून आम्ही धडा शिकलो असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथील जाहीर प्रचारसभेत दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचा संकल्प केला आहे. शेतकऱ्यांसाठी यापुढे दिवसा वीज मिळेल. त्यासाठी बिलही आकारले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विकासासाठी लक्ष घातले आहे. त्यासाठी लखपती दीदी योजना आहे. आगामी काळात राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी केले जाणार आहे. महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. कांद्याचे बाजारभाव कोसळल्यावर सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये दराने आर्थिक मदत दिली आहे. सोयाबीनला ६ हजार रुपये दराने हमीभाव देण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. चांदवड-देवळा मतदारसंघातही किमान २५ हजार महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे काम आमदार डॉ. आहेर यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.