Published on
:
27 Nov 2024, 6:48 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:48 am
लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर, नांदेड व पुणे येथून चोरी केलेल्या १० मोटारसायकलीसह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. लखन वाघम्बर छपरावळे, (वय २४, रा. हिप्पळगाव, तालुका शिरूर अनंतपाळ), असे त्याचे नाव आहे.
पोलिस मोटारसायकल चोरीचा विशेष पथके तपास करीत होते. दरम्यान २५ डिसेंबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक गुन्हेगार त्याने चोरलेली मोटा रसायकल विकण्यासाठी भामरी चौक परिसरात फिरत आहे. असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्याला पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव लखन बाघम्बर छपरावळे असे सांगून त्याच्याजवळील मोटारसायकल दोन वर्षांपूर्वी लातूर शहरातून चोरल्याचे सांगितले, त्याच्याकडे आणखीन तपास केला असता त्याने लातूरसहित नांदेड व पुणे जिल्ह्यातूनही मोटारसायकली चोरी करून एमआयडीसी परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले.
त्यावरून त्याने लातूर नांदेड व पुणे जिल्ह्यातून चोरी केलेल्या ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली हस्तगत केल्या. पोलिस ठाणे शिवाजीनगर लातूर येथील १, नदिड जिल्ह्यात २ तसेच पुणे जिल्ह्यातील ४ असे एकूण ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेल आहेत. आरोपीला पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलिस ठाणेचे पोलिस पुढील तपास करीत आहेत. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, विनोद चलवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, संतोष खांडेकर, राजेश कंचे, चालक पोलिस अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, यांनी पार पाडली.