वडशिंगीच्या जि. प. शाळेत मातृशक्तीचा जागर:अध्ययन, अध्यापनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी नवरात्रीनिमित्त उपक्रम‎

2 hours ago 1
नवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात थोर महिलांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी. प्रतिनिधी | जळगाव जामोद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भारताला लाभलेल्या समृद्ध मातृ शक्तीची माहिती करून देण्याच्या हेतूने व अध्यापनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी नवरात्र महोत्सवानिमित्त वैचारिक नवरात्रोत्सव व जागर मातृ शक्तीचा हा अनोखा कार्यक्रम वर्गशिक्षक अनिल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला. या उपक्रमांतर्गत नऊ दिवस विविध राजकीय, सामाजिक, वैचारिक, साहित्यिक, वैद्यकीय व इतर क्षेत्रातील नऊ स्त्रियांची वेशभूषा करीत त्यांचे विचार व माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यामध्ये माँ जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, य सिंधुताई सपकाळ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अक्षरयात्री बहिणाबाई चौधरी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, अशा विविध क्षेत्रातील नऊ थोर महिलांची वेशभूषा करीत त्यांचे चारित्र्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. दररोज एक याप्रमाणे एका महिलेची माहिती देण्यात आली. शेवटच्या दिवशी श्रद्धा वाघ, अर्पिता भगत, तन्वी तायडे, समृद्धी जाधव, आरुषी जाधव, जागृती शेवाळे, गौरी मारोडे,आरती सोनोने, सलोनी बावणे या विद्यार्थ्यांना शाळेकडून भेटवस्तू तर शाळा समितीकडून रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय म्हसाळ, शिक्षक सारंगधर बांगर, श्रीकृष्ण भटकर, अनिल भगत, सुनीता येनकर, वर्षा राजगुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष वकील खान, उपाध्यक्ष पायल जाधव यांच्यासह पालक व शिक्षक उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article