उमरी मेघे येथे नितेश कराळे मास्तरांना बेदम मारहाण करण्यात आली. File Photo
Published on
:
20 Nov 2024, 12:13 pm
Updated on
:
20 Nov 2024, 12:13 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना बेदम मारहाण करण्यात आली. उमरी मेघे येथे मतदान केल्यानंतर कराळे मास्तर आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर येत होते. यावेळी हा प्रकार आज (दि.२०) दुपारी घडला. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे.
कराळे मास्तर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून मारहाण करणारा हा आमदार पंकज भोयर यांचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. गुंडाराज सुरू असल्याचा दावा कराळे मास्तर यांनी केला आहे.