वाळू तस्करांकडून लाखाची लाच;‎नांदेडमध्ये पाच पोलिस निलंबित:उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली कारवाई‎

2 hours ago 1
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून १ लाख ३‎हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका पोलिस‎उपनिरीक्षकासह, ५ पोलिसांना नांदेड विभागाचे‎पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ११‎रोजी निलंबित केले. तसेच अवैध वाळूसाठा‎जप्त करण्यात आला अाहे. महसूल‎विभागाकडूनही रात्री उशिरापर्यंत‎वाळूसाठ्याच्या पंचनाम्याची कारवाई सुरु‎होती.‎ लोहा येथील बायपास रोडवर ११ रोजी पहाटे‎काही पोलिस अधिकारी व अंमलदारांनी, वाळू‎तस्करी करणारी वाहने अडवली. या वाहनांवर‎कारवाई न करण्यासाठी ते पैसे स्वीकारत‎असल्याची माहिती उप महानिरीक्षक उमाप‎यांना मिळाली होती. त्यांनी कंधार उपविभागीय‎पोलिस अधिकारी अश्विनी जगताप यांना‎याची माहिती दिली. तसेच पैसे घेणाऱ्या‎पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.‎मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप‎या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच, लाचखोर‎पोलिस त्यांच्या खासगी वाहनातून लोहा येथून‎नांदेडकडे निघाले होते. या प्रकरणी पोलिस‎उपमहानिरीक्षक उमाप यांनी या पाचही जणांना‎तडकाफडकी निलंबित केले. त्यांची प्राथमिक‎चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी देगलूर‎यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.‎ रात्रीच केले वाळूचे पंचनामे‎ वाहेगाव भंगी येथून वाळूची तस्करी होत‎असल्याने, सोनखेड पोलिसांच्या पथकाला‎उपमहानिरीक्षक उमाप यांनी घटनास्थळी‎पाठवले. त्या ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून‎५० तराफ्यांद्वारे १०० हून अधिक मजूर वाळू‎उपसा करत असल्याचे आढळून आले.‎गोदावरी पात्रात अशाप्रकारे ६ ठिकाणी सुमारे‎३०० ब्रास वाळू नदीपात्रातून बाहेर साठवून‎ठेवल्याचेही आढळून आले. त्या ठिकाणी‎महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री‎उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.‎ झडतीत आढळली रोकड‎ शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता‎पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील‎तिरंगा चौकात, नाकाबंदी करून,‎लाचखोर पोलिसांच्या खासगी‎वाहनास रोखण्यात आले. वाहनात‎पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हलसे,‎हवालदार ब्रह्मानंद लामतुरे आढळून‎आले. झडती घेतली असता दोघांकडे‎१ लाख ३ हजारांची रोकड सापडली.‎तर कॉन्स्टेबल राम मुळे, महेश कावळे‎व तुकाराम जुन्ने हे लोहा येथेच थांबले‎होते. पाचही पोलिसांचे निलंबन झाले.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article