विजघर येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

4 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Nov 2024, 1:00 am

Updated on

23 Nov 2024, 1:00 am

दोडामार्ग : विजघर येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या एकावर स्थिर सर्वेक्षण पथकाने गुरुवारी रात्री 11.30 वा.च्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत एकूण 8 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी विनोद धर्माप्पा दोडमणी (35, रा.निलननगर, शिरुर, जि. बागलकोट-कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद दोडमणी हा टाटा कँटर घेऊन गोव्याहून विजघर मार्गे कर्नाटकच्या दिशेने जात होता. विजघर येथील तपासणी नाक्यावर तो आला असता स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणीसाठी थांबविला. यावेळी कँटरची झडती घेतली असता आतमध्ये गोवा बनावटीचे मद्य आढळले. यात गोवा काजू फेणी लेबलच्या 180 मिली मापाच्या 75 रु. किमतीच्या 144 बाटल्या होत्या. याची किंमत 10 हजार 800 रुपये व 8 लाख किमतीचा कँटर असा मिळून 8 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी चालक विनोद दोडमणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थिर सर्वेक्षण पथक प्रमुख तथा भूकर मापक, भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र चव्हाण, पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती कर्मचारी दशरथ शिंदे, पोलिस नाईक राजेश गवस, होमगार्ड अनिकेत गवस व कॅमेरामॅन आकाश वाघेला यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article