विज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी हवा:त्रिमूर्ती कॉलेजमधील व्याख्यानमालेत डॉ. अमरनाथ जगदाळे यांचे मत

2 hours ago 1
विज्ञानाचा उपयोग हा समाजकल्याणासाठीच हवा. असे केले नाही, तर हे जग नष्ट होईल. आपला देश युवकांचा देश आहे आणि युवकांच्या बळावरच आपण प्रगत राष्ट्र होणार आहोत, असे प्रतिपादन डॉ अमरनाथ जगदाळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नेवासे फाट्यावरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सी. एस. आरसुळे, उपप्राचार्य प्रा. निकिता बर्गे उपस्थित होते. अमरनाथ जगदाळे यांनी व्याख्यानामध्ये प्रयोग सादर केले. त्यांनी दररोजच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन कशा पद्धतीने जोपासला पाहिजे हे सोप्याभाषेत सांगितले. विज्ञान कशा पद्धतीने खास आहे, ते कसे अधिकाधिक प्रगत होत गेले, याचेही दाखले दिले. प्रा. निकिता बर्गे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या देशावर प्रेम करावे. जात, धर्म विसरून विद्यार्थ्यांनी देशाची प्रगती कशा प्रकारे करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरसुळे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन कसा आत्मसात करावा, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय राहून जीवनाचा विकास कशाप्रकारे केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. कल्याणी वरखुडे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. विनोद शिनगारे यांनी प्रास्ताविक केली. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष जावळे यांनी केले. प्रा. अमोल पाचारणे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानमालेला प्रतिसाद मिळत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article