विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे कटाक्षाने लक्ष द्या- पेंदोर:विद्यार्थिनी व महिला सुरक्षा मार्गदर्शन शिबिर यशस्वी

11 hours ago 1
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या उपाययोजना संदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी निर्णय घेतले जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडच्या काळात घडलेल्या काही अनुचित घटनांचे शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच काही नवीन उपाययोजना आपल्या स्तरावर अधिक चांगल्या पद्धतीने लागू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धाड ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी केले. ते, धाड येथील ज्ञान देवराव बापू दांडगे विद्यालयात आयोजित विद्यार्थिनी व महिला सुरक्षा मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना पेंदोर यांनी आव्हान केले की, कोणत्याही अडचणीच्या वेळी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. पोलीस सदैव तुम्हाला मदत करतील, ते तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत असा विश्वासही दिला. यावेळी त्यांनी सायबर क्राईम गुन्हे कसे घडतात. मोबाइलच्या माध्यमातून आपण यामध्ये कसे अडकलो जातो, याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्वतोपरी सुरक्षा मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे पालन करणे, परिवहन समिती स्थापन करणे, विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठित करणे व योग्य पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य संतोष डवले यांनी केले. आभार संतोष दांडगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष दांडगे, प्राचार्य संतोष डवले, उपप्राचार्य अमोल जाधव, प्रवीण चव्हाण, विभागप्रमुख सुषमा राजपूत, प्रणाली बोर्डे, उषा शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article