विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपा आयुक्तांची अचानक तपासणी:पुरवलेल्या साहित्याचा उपयोग होतो की नाही याबाबत घेतली माहिती

2 hours ago 1
महानगर पालिकेच्या शाळांसह विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्यासोबतच व्यवस्थित शिक्षण सुरू आहे की, नाही. विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले डिजिटल साहित्य योग्यप्रकारे उपयोगात आणले जात आहे, की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी बुधवार १६ रोजी काही शाळांना भेट देत पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना काही अडचणी आहेत काय, याबाबत माहिती घेतली. मनपा मराठी शाळा क्रमांक १३ चपराशी पुरा, मनपा उर्दू शाळा क्रमांक ६ चपराशी पुरा, मनपा हिंदी शाळा क्रमांक ६ फ्रेजरपुरा ,मनपा मराठी कन्या शाळा क्रमांक ६ फ्रेजरपुरा व मनपा उर्दू शाळा क्रमांक ५ फ्रेजरपुरा अशा एकूण सहा शाळांना मनपा आयुक्तांनी आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर हितगुज साधले, मनपा शाळांना पुरविण्यात आलेल्या डिजिटल साहित्यांची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत माहिती घेतली. त्याचप्रमाणे सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक गुणवत्ता व शाळांसाठी आवश्यक भौतिक सोयी सुविधा बाबत सविस्तर चर्चा केली. मनपाद्वारे शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याबाबतही त्यांनी माहिती घेत काही निर्देश दिले. सोबतच प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी व्यवस्थित आहे की नाही. प्रसाधनगृह नियमित स्वच्छ ठेवावे, अशा सुचनाही दिल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article