विद्यार्थ्यांनी उलगडला वैज्ञानिक आविष्कार:केडगावातील ओअॅसिस स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनात सहा शाळांच्या विद्यार्थ्यांची 227 उपकरणे
2 hours ago
1
विज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील कामे सुसह्य बनविणारी साधने, विज्ञानाच्या आधारे पर्यावरण संवर्धन करू शकणारी यंत्रणा, वॉटर सायकल, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सौर उर्जेपासून वीज निर्मिती आदी वैज्ञानिक कल्पनांचा आविष्कार शालेय मुलांनी वैज्ञानिक उपकरणातून उलगडला. निमित्त होते,केडगाव येथील ओअॅसिस इंग्लिश स्कूलतर्फे आयोजित "विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेचे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची उत्कृष्ट व प्रत्येकाच्या बुद्धीला चालना देणारी अशी २२७ उपकरणे मांडली होती. होती. नर्सरीपासून ते दहावीतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका वैशाली कोतकर या होत्या. याप्रसंगी भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केडगाव चे मुख्याध्यापक बेरड, केडगावातील जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अहमदनगर कॉलेजच्या प्रा.ललिता देशमुख, भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयाचे संजय गोसावी यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात भाग्योदय विद्यालय, आयकॉन पब्लिक स्कूल, भाऊसाहेब फिरोदिया स्कूल, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व ऊर्जा गुरुकुल या शाळांनी सहभाग घेतला. प्री प्रायमरीतील चिमुकल्यांनीही सुरेख पद्धतीने उपकरणे तयार करुन त्याचे सादरीकरण केले. लहान गट, माध्यमिक गट व मोठा गट अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विजेते घोषित करून त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी स्कूलमध्ये पालकांनी गर्दी केली होती. विज्ञान विभागाच्या शिक्षिका कल्पना दारकुंडे व सोनाली घिगे यांनी या प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले. संस्थेच्या संचालिका वैशाली कोतकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य संतोष देवरे यांनी या प्रदर्शनाचा उद्देश सांगितला व आलेले विद्यार्थी, शिक्षकांचे स्वागत केले. पर्यवेक्षक पांडुरंग गवळी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. सूत्रसंचालन मंजिरी गीते यांनी, तर आभार शरद पवार यांनी मानले. प्रदर्शनातील विजेते छोटा गट : प्रथम : अर्चित चोरबेले, मोहित चागलानी, सोहम बोरा (अशोक भाऊफिरोदिया स्कूल), द्वितीय : क्रांती सातपुते (ओअॅसिस स्कूल), तृतीय : अन्वी शिंदे (ऊर्जा गुरुकुल)मोठा गट : प्रथम : वीर बोरा, अभिराज वाघस्कर (आयकॉन स्कूल), द्वितीय : आदित्य कोतकर, साहिल कोळाने (अशोकभाऊफिरोदिया स्कूल), तृतीय : सार्थक देठे, आर्यन भागवत, नैतिक भोर, दीपक शहा (ओअॅसिस स्कूल) विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करणारा उपक्रम ^विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करणारा हा विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम आहे. नवीन वैज्ञानिकांची बीजे अशा विज्ञान प्रदर्शनातून रोवली जातात. या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यात संशोधक, शास्त्रज्ञ घडतील. हाच प्रमुख उद्देश या विज्ञान प्रदर्शनामागील आहे. -वैशाली कोतकर, संचालिका, भैरवनाथ एज्यूकेशन सोसायटी, केडगाव.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)