विधानसभेला स्थानिक उमेदवार द्या, अन्यथा लढणार:अनुसूचित जाती कृती समितीचा माळशिरसमध्ये निर्धार

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदार संघात खरा दलित चळवळीतील स्थानिक चेहऱ्याला उमेदवारी न दिल्यास अनुसूचित जाती कृती समिती स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माळशिरस येथील निर्धार मेळाव्यात करण्यात आली. माळशिरस विधानसभा सन २००९ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत डोळस हे दोन वेळा तर मोहिते पाटील प्रणित भाजपचे राम सातपुते हे गत २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले.हनुमंत डोळस हे माळशिरस तालुक्यातील असले तरी पूर्वीपासून मुंबईला रहात होते,तर मागील वेळचे राम सातपुते हे बीड वरून आयात केले असल्याचा या तालुक्यातील दलीत कार्यकर्त्यांचा आरोप असून यावेळी तरी स्थानिक दलीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी अनुसूचित जाती कृती समिती स्थापन केली असून त्यामाध्यमातून ते सातत्याने मागणी करत आहेत. माळशिरसच्या या मेळाव्यात ही बोलताना कार्यकर्त्यांनी आजपर्यंत डावलल्याचीच खंत व्यक्त केली व आता सन्मानपूर्वक उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे बोलून दाखवले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article