Amit Shah and Vinod Tawde Meeting : महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याची चर्चा होत आहे. अशातच विनोद तावडे आणि अमित शाह यांची बैठक झाली आहे.
अमित शाह, विनोद तावडेImage Credit source: ANI
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे.
महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक
महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.