विमानतळाचे कार्यकर्ते पक्षाच्या काय कामाचे; नितीन गडकरींची टोलेबाजी:बागडे यांच्या सत्कारप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

3 hours ago 1
सध्या विमानतळावर स्वागतासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज वाढली आहे, असे सांगत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी, फक्त विमानतळावर येणारे कार्यकर्ते पक्षाच्या काय कामाचे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. निमित्त होते राजस्थानचे राज्यपाल व भारतीय जनता पक्षाचे नेते हरिभाऊ बागडे यांनी ८०व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याचे. केंब्रिज चौक येथील श्रीरामचंद्र मठ मैदानावर शुक्रवारी (२७ सप्टेंबर) हा समारंभ झाला. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसव्यतिरिक्त इतर पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या वेळी गडकरी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी उपहास आणि अपमान सहन करीत राजस्थानचे राज्यपाल बागडे यांनी समर्पित भावनेने राष्ट्रनिर्माणाचे काम केले. एकीकडे पक्षात लाळघोटे कार्यकर्ते वाढत आहेत. नेत्यांना विमानतळावर जाऊन हारतुरे घालणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बागडेंच्या सार्वजनिक जीवनात कुठेच त्यांनी पदाचा अभिनिवेश बाळगला नाही. एक दैवदुर्लभ कार्यकर्ता हीच त्यांची ओळख आहे. ग्राउंड लेव्हलचे असे असतात कार्यकर्ते विमानतळ कार्यकर्ते असे अोळखावेत विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांची कार्यक्रमाला गर्दी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ८०व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article