शंभर दिवसांत 2500 घरकुले बांधणार:कळवण तालुक्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळणार पक्के घर
2 hours ago
1
केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या घरासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत तालुक्यात २५०० घरकुल १०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी चार प्रकारच्या समित्यांची रचना करत १०० दिवसात ही घरकुले लाभार्थ्यांकडून पूर्ण करुन घेतली जाणार आहेत. याची सुरवात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर नांदुरी ग्रामपंचायतीपासून झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्यांना पक्की घरे मिळावी, यासाठी शासनाने क्रमवारी नेमली असुन आता पंतप्रधान योजनेतील घरकुलाची ‘ड' यादी सुरवात झाली आहे. याच अनुषंगान नांदुरी येथे मंजूर घरकुलासाठी पायाची आखणी गटविकास अधिकारी रमेश वाघ व सहाय्यक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कळवण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालकत्व देण्याचे नियोजन केले असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदुरीचे घरकुल पालकत्व देण्यात आले आहे. यावेळी मंजूर घरकुल लाभार्थी नाना भगवान गवळी व साहेबराव राजाराम गवळी यांच्या घरकुलांच्या पायांची आखणी करत कुदळ मारत उद्घाटन केले. यावेळी सरपंच प्रकाश राऊत, ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, ग्रामसेवक पंडित महाजन, घरकुल अभियंता दीपक खांडेकर, कैलास राऊत, संजय खिल्लारी आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन प्रजासत्ताक दिनापासून कळवण पंचायत समितीस २,५०० पंतप्रधान घरकुल योजनेचे उद्दिष्ट १०० दिवसांत पूर्ण करण्यासाठी पालकत्व देण्यात आले असून घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले घरकुल बांधून पूर्ण करावे. - रमेश वाघ, गटविकास अधिकारी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)