शहरातील नवे आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवरच:‘मला मंत्रिपद मिळणार’- आ. संजय शिरसाट

2 hours ago 1
महायुतीमध्ये आमदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिपदासाठी चुरस आणखी वाढली आहे. त्यामुळे यापूर्वी त्या-त्या जिल्ह्यात असलेली मंत्रिपदे कायम राहणार की नाही यावर मुंबईत राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आमदार संजय शिरसाट मंत्रिपदासाठी गेल्या वेळीही इच्छुक होते. आता या मंत्रिमंडळात जाण्यासाठी ‘मी इच्छुक असून मला संधी मिळणार’ असल्याचा दावा शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की, ‘महायुतीच्या तिन्ही पक्षांत या विधानसभेत आमदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्व विभागांना आता न्याय द्यावा लागणार आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे १० ही उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्या भागातही मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत. प्रत्येक भागात संख्या वाढल्यामुळे त्या-त्या जिल्ह्यात त्या विभागात मंत्रिपदे द्यावी लागणार असल्याची माहिती शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिली. तेव्हा कुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळते हे पहावे लागणार आहे. पक्षश्रेष्ठींनी आमदारांना पाठवले पुन्हा मतदारसंघात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगितल्याचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्हाला मतदारसंघात जाऊन भेटीगाठी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी मंगळवारी संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. मंगळवारी हर्सूलसह सिडको-हडको इतर भागात जाऊन लोकांच्या भेटी घेणार’ असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल सावे म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबत वेळ असल्यामुळे मीदेखील मतदारसंघात परत येत आहे. मतदारसंघातल्या लोकांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article