शाळेच्या सुट्ट्या संपताच बसस्थानके गजबजली file photo
Published on
:
18 Nov 2024, 8:05 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:05 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद राहणार असल्या तरी शाळा नियमितपणे १६ नोव्हेंबर पासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सुट्ट्यात कुटुंबियांसह गावाकडे गेलेले विद्यार्थी परतीच्या मार्गावर आहेत. त्याच बरोबर २० नोव्हेंबरला मतदान असल्याने कामानिमित्त विविध ठिकाणी असलेले मतदार आपापल्या गावी येण्यासाठी गर्दी करत असल्याने रविवारी (दि.१७) मुख्य बसस्थानकांसह सिडको बसस्थानक प्रवाशांनी गजबजले होते.
शाळांना दिवाळीच्या सुट्टा १५ नोव्हेंबर पर्यंत होत्या. १६ नोव्हेंबर पासून शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. १८ ला रविवार आणि पुढील तीन दिवस मतदानांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरी दिवाळीच्या सुट्ट्यात गावांकडे, मामाकडे किवा पर्यटनाला गेलेले कुटुंबिय विद्याथ्यर्थ्यांसह परतत असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रविवार बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. बस प्रमाणेच रेल्- वेस्थानकांवरही प्रवाशांच्या मोठी गर्दी असल्याने सर्वच मार्गावरील रेल्वे हाऊसफुल झाल्या आहेत.
मतदारांचीही गर्दी
शाळां बरोबरच २० नोव्हेंबर मतदानाचा दिवस असल्याने कामानिमित्त शहरात असलेले तसेच कामांनिमित्त शहरांबाहेर गेलेले मतदार आपापल्या गावी परतत आहेत. त्यामुळेही रेल् बेसह विविध मार्गावरील बसला गर्दी वाढली आहे. ही गर्दी दोन दिवस राहणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर २१ नोव्हेंबर पासून प्रवाशांची गर्दी ओसरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नोव्हेंबरअखेर नव्या लालपरीचे आगमन
राज्यातील विविध आगारांना सुमारे २५०० नवीन लालपरी प्रवाशांच्या सेवेत उतरवणार आहेत. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईसह कोकणात बस देण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबरमध्येअखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागाला नवीन लालपरी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शासनाच्या वतीने राज्यात एसटी महामंडळाला नवीन बस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या बस मिळणार आहेत. यात छत्रपती संभाजीनगर विभागाचाही समावेश असून नोव्हेंबरच्या अखेरीस २० नव्या कोऱ्या लालपरी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या बस मिळाल्यानंतर प्रवाशांना चांगली सेवा देता येणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होणार आहे.