शिरपूर ते शहादा महामार्गाची दुरवस्था:खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही होतेय दुर्लक्ष

3 hours ago 1
बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावरील शिरपूर ते शहादा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. शिरपूर-शहादा राज्य महामार्ग हा महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशला जोडणारा महत्वपूर्ण दुवा असून धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांसह संपूर्ण खान्देशाला जोडणारा राजमार्ग आहे. परंतु त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. यापूर्वी अनेकदा अपघातांची मालिका घडूनही त्यातून बोध घेतला जात नाही. महामार्गालगत वाघाडी, अर्थे, विखरण, वरुळ, भटाणे, तऱ्हाडी, आदी गावे असून तेथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होते. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा रस्ता मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात अशा तीन राज्यांना जोडणारा असल्याने मोठ्या वर्दळीचा आहे. जादा अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत.त्यामुळे अप्रिय घटना होण्याची शक्यता वाढली आहे. असे असतांना देखील संबंधीत विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री- अपरात्री हे रस्ते वाहनांसाठी घातक ठरत आहे. शारीरिक व्याधींचे मूळ ठरलेल्या या रस्त्यांची चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पाठीचे, मानेचे दुखणे बळावले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article