नंदनवनात बर्फवृष्टीला सुरुवात
जम्मू-कश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. हिमाचलमधील कुल्लू जिह्यातील रोहतांग पास आणि अटल बोगद्याजवळ तसेच कुपवाडा, गुलमर्ग आणि जम्मू-कश्मीरच्या बांदीपोरा आणि लडाखच्या लेहमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. हा पर्यटनाचा हंगाम असून बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याचेही चित्र आहे. दरम्यान, देशातील 8 राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यात पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीचा समावेश आहे.
एक हजार वर्षे जुन्या श्रीराम मूर्तीची डागडुजी
आंध्र प्रदेशच्या तिरुमाला तिरुपती देवस्थानात एक हजार वर्षे जुनी श्रीरामाची मूर्ती आहे. मूर्ती अतिप्राचीन असून मूर्तीच्या बोटाचे नुकसान झाले होते. ते ठिक करण्यात आले असून त्याचा ‘अंगुली साधना संप्रोक्षण’ सोहळा नुकताच पार पडला. देवस्थानने शनिवारी याबाबतची माहिती दिली.
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2021 साली श्रीराम मूर्तीच्या डाव्या हाताच्या बोटाचे नुकसान झाले होते. त्यानंतर मंदिरातील अधिकाऱयांनी ते सुवर्ण कवचाने झाकून ठेवले होते. श्रीरामाची ही पुरातन मूर्ती पर्वतांमध्ये सापडली होती, असे सांगितले जाते.
व्हॉट्सअॅप लॉगआऊट राहिले; काळजी नको
लिंक डिव्हाईस या फीचर्सच्या मदतीने व्हॉट्सअॅप कुठे चालू आहे हे शोधता येईल. अनेकदा आपण
व्हॉट्सअॅपवर लॉगिन करतो, परंतुनलॉगआऊट करायला विसरतो. परंतु आता काळजी नसावी. कारण कोणत्याही डिव्हाईसवर तुमचा नंबर वापरूननव्हॉट्सअॅपमध्ये लॉगिन केले असेल किंवा इतर कोणत्याही डिव्हाईसवर कुणीतरी तुमचा नंबर लॉगिन केला आहे की नाही हेदेखील तुम्हाला कळू शकेल. त्यासाठी सर्वप्रथमनअॅप उघडल्यावर उजव्या बाजूला दिसणाऱया तीन डॉटन आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डिव्हाईस पर्यायावर क्लिक करावे लागेल. लिंक केलेल्या डिव्हाईसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअॅप सुरू असलेल्या डिव्हाईसची सूची मिळेल.
जीमेलमध्ये पैसे न देता जागा करा तयार
आता जीमेलमध्ये स्पेस तयार करण्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. जीमेल, पह्टोज, ड्राईव्हमध्ये डेटा वाचवण्यासाठी 15 जीबी मोफत स्टोरेज दिले जाते. आवश्यक नसलेली जुनी वृत्तपत्रे, जाहिराती, जुने चॅटिंग यांसारखे ई-मेल डिलीट करावे. ई-मेलसोबत जोडलेले अटॅचमेंट जास्त जागा घेतात. सर्च बारमध्ये has:attachment larger:10M ‘eRh kjtv 10MB टाईप करून 10MB पेक्षा मोठय़ा अटॅचमेंट शोधून त्या डिलीट करू शकता.
इयरबड्स ठेवा स्वच्छ नाहीतर आरोग्य बिघडेल
अस्वच्छ इयरबड्समुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ते स्वच्छ ठेवा. मायक्रोफायबर कापड, मऊ ब्रश किंवा किंचित ओले कापड वापरून इयरबड्स स्वच्छ करता येतात. त्याआधी इयरबड्सची पॉवर बंद करा. इयरबड्स स्वच्छ करण्यापूर्वी ते चार्ंजग केसमधून बंद आणि बाहेर आहेत याची खात्री करा. मायक्रोफायबर कापडाने इयरबड्सचा बाह्य पृष्ठभाग पुसून घ्या. स्पीकर ग्रिलमध्ये जमा झालेली घाण ब्रशने हलकी स्वच्छ करा.