टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी (25 नोव्हेंबर) 295 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 58.4 ओव्हरमध्ये 238 धावांवर गुंडाळला. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.