शिवकालीन तलवारी, दांडपट्टा, कट्यार पाहून जागली वीरवृत्ती:विद्यार्थ्यांना सैनिक होण्याची प्रेरणा- बडवे

2 hours ago 1
करकंब येथे युगंधर क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विठ्ठल मंदिरात शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिवकालीन तलवार, भाला, ढाल, गुप्ती, दांडपट्टा, धनुष्यबाण, बंदुक, कु-हाड, कट्यार, चिलखत इत्यादी शस्त्रांबरोबरच शिवकालीन नाणी, वस्तू पाहून विद्यार्थ्यांतील वीरवृत्ती जागवली. शस्त्र प्रदर्शन पहाण्यासाठी करकंब परासरातील अनेक शाळांचे विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून करकंब येथील युगंधर क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विठ्ठल मंदिरात शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिध्द वक्ते ॲड. आशुतोष बडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिग्विजय बडवे, अनिल बन्ने, शरदचंद्र पांढरे, आयोजक राजेंद्र अनवते, हरी जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बडवे म्हणाले, शस्त्र प्रदर्शनातूनच सैनिक व वीर जवान होण्याची प्रेरणा मिळते म्हणून अशा शस्त्रप्रदर्शनाची खरी गरज आजच्या युवकांना आहे. राष्ट्राच्या सीमा शस्त्रांचा धारेवरच आखल्या जातात. सैनिक देशाच्या सीमेवर असल्यानेच आपण सुरक्षित आहोत. इतिहासातील प्रेरणा , माहिती, ज्ञान या माध्यमातून मिळते. करकंब सारख्या गावात मैदानी खेळाचे चार आखाडे चालतात त्यामुळे याबाबतीत ते पंढरपूर पेक्षा मोठे आहे. करकंब हे तालुक्याचे गाव व्हायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुरुवातीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती बार्डी येथील विद्यार्थ्यीनींनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अनवते यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्षात आताच्या मुलांना शाळेतील पुस्तकातच शिवकालीन शस्त्रे, वस्तू यांची नावे वाचण्यात येत होती. परंतु या प्रदर्शनातून ती प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. याचबरोबर त्याकाळी असणारी चलनातील नाणी, शेर, मापटे, कोळवे तसेच शेतात लागणा-या व दररोज वापरात असणा-या वस्तू याबाबत माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. राजेंद्र अनवते, आयोजक करकंब

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article