शिवनेरी सुंदरीवरून जितेंद्र आव्हाड यांची टीका:म्हणाले - विमान अन् बसची तुलना करणे म्हणजे भरत गोगावलेंचे पाय धरले पाहिजे

1 hour ago 1
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात आहेत. अशात आता विमानातील एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी घेतला आहे. या निणर्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाण साधला आहे. विमानाची आणि बसची तुलना करणे म्हणजे भरत गोगावले यांचे पाय धरुन नमस्कार केला पाहिजे, असा घणाघणात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विमानाची आणि बसची तुलना करणे म्हणजे भरत गोगावले यांचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे. आपण पाहिले तर एसटी महामंडळाकडे चांगल्या धड चार बस नाहीत. शिवनेरी बसमधील या 'शिवनेरी सुंदरीं'ना छत्री द्यावी लागेल, कारण बसमध्ये पावसाचे पाणी गळते. किमान चांगले ड्रायव्हर ठेवू, कंडक्टर ठेवू, असे काहीतरी म्हणा. आता 'शिवनेरी सुंदरीं'ना काम तरी काय देणार हे त्यांनी सांगावे, असा प्रश्नही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भरत गोगावले यांना केला आहे. शिवनेरी सुंदरीचा नेमका निर्णय काय? भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या संचालक मंडळाची मंगळवारी 304 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. या योजनेमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा उंचावेल अशी भावना व्यक्त केली जात आहे. प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article