शिवर येथे हनुमंतराय मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव, शिव महापुराण कथेला प्रारंभ; गरुड ध्वज स्थापन

2 hours ago 1
शिवर येथील श्री मारुती संस्थान संचालित श्री संत गजानन महाराज सेवा समितीकडून श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराचा पाचवा वर्धापन दिन व श्री हनुमंतराय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम तसेच गरुड ध्वज व दीपस्तंभ स्थापन कार्यक्रम व शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. श्री सोपान महाराज शेजोळे यांच्या सानिध्यात श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सकाळच्या सत्रात होत आहे. महंत श्री १०८ स्वामी सुरेश्वरावनंद गिरी उर्फ श्री दासगिरी महाराज यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन केले आहे. २० ऑक्टोबर रोजी शिवर नगरातून भव्यदिव्य नगर प्रदक्षिणा व रथयात्रा असून या निमित्त ५१ वारकरी दिंडीचा सहभाग होणार आहे. सोमवारी श्री तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या हस्ते व महंत श्री श्री १०८ श्री कृष्णानंद भारती महाराज वारी हनुमान, संजय महाराज पाचपोर व गोपाल महाराज उरळकर यांच्या हस्ते श्री हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा सकाळी १० ते ११ या वेळेत होणार आहे. याच दिवशी काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे होणार आहे. कीर्तन आटोपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मंदिर प्रमुख धनंजय महाराज मोरखडे व संस्थानचे व्यवस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील वैराळे यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article