शेंदूरजनाघाट नगर परिषदेचा मकरसंक्रांती निमित्त मेळावा:महिला मेळाव्याने आणली बहार, आरोग्यविषयक मार्गदर्शन
2 hours ago
1
दिनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मंगळवारी २१ जानेवारी रोजी रणरागिणी शहर स्तर संघ व गावातील सर्व वस्तीस्तर संघ, नगरपरिषद शेंदुरजना घाट महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रणरागिणी शहर स्तर संघाच्या अध्यक्ष मीना कपले उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता खेरडे , माजी नगरसेविका रेखा अढाऊ,मोनिका भोंगाडे, मंदा वसुले, जागृती वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष व रणरागिणी शहर स्तर संघाच्या सचिव निता पोटे, माजी न.प. सदस्य निर्मला घोरपडे, वनिता चिंचणी, किशोरी चौधरी,नीता हमाने, निलिमा डाके, जिजा बोरकुटे, कल्पना होले,माधुरी माहोरे, संभाजीनगर येथून आलेले प्रियांश वेलनेस सेंटरच्या प्रशिक्षक प्रियंका लगड व अक्षय लगड यांनी महिलाना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. वाढलेल्या वजनामुळे होणारे त्रास जसे बीपी, शुगर, हातापायाला मुंग्या येणे ,गोळे येणे ,चक्कर येणे, चिडचिडेपणा होणे,अशक्तपणा जाणवणे,हे सर्व आजार आपण योग्य व्यायाम व संतुलित आहारहच्या मदतीने बरे करू शकतो. तेव्हा किमान महिलांनी घरबसल्या व्यायामासाठी अर्धा तास जरी दिला तरी हे सर्व आजार दूर होऊ शकतात, असे मार्गदर्शन प्रियंका लगड यांनी केले.याप्रसंगी प्रियंका लगड व अक्षय लगड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी अभियाना विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला हेमंत एलचटवर व सेल्समन सुनील बोरुले यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक मेघा महल्ले यांनी केले तर संचालन समुदाय संघटक उमेश माहोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीआरपी कीर्ती चौधरी ,माला कंगाले ,ममता अढाऊ ,काजल शेंडे, मनीषा नांदुरकर यांनी सहकार्य केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)