शेअर बाजारात चांगले रिटर्न देतो सांगत भुलवलं, पुण्यात दोघांची 41लाखांची फसवणूक

2 hours ago 1

झटपट पैसा , चांगली रक्कम मिळवण्याचा मोह अनेकांना असतो, मात्र अशा लोकांना हेरून त्यांची फसवणूक करून जन्मभराची कमाई लुटण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. असाच काहीस प्रकार पुण्याचही घडला असून तेथे सायबर चोरट्यांनी फ्रॉड करत दोन व्यक्तींचे तब्बल 41 लाख रुपये लुटल्याचे समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाणमधील एका व्यक्तीची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.याबाबत मुंढवा आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिस अधिक तपास करत फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील एका 37 वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यातील माहितीनुसार, शेअर बाजारात चांगला परतावा देतो असं सागंत चोरट्यांनी या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेकडून वेळोवेळी पैसे घेत त्यांनी एकूण 23 लाख 50 हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. मात्र बराच कालावधी उलटून गेल्यानंतर महिलेने त्यांच्याकडे परतावा मागितला असता त्यांन तिला पैसे दिलेच नाहीत. डिसेंबर ते जानेवारी या एका महिन्याभरात हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

तर अन्य एका घटनेत सायबर चोरट्यांनी पाषाणमधील 44 वर्षीय व्यक्तीला 17 लाख 74 हजार रुपयांचा गंडा घातला. चोरट्यांनी त्यांना 17 सप्टेंबर रोजी मोबाईलवर लिंक पाठवली आणि एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा संदेश पाठविला. त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना परताव्यापोटी काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी पैसे देत एकूण 17 लाख 74 हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु भामट्यांनी त्यांना त्यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. अखेर फिर्यादीने बाणेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत

ऑनलाइन मॅट्रिमोनिअल साईटवरून तरूणींची फसवणूक करणाऱ्या तरूणाला अटक

आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन मॅट्रिमोनिअल साईटवरून तरूणींची फसवणूक करणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. हा मॅट्रिमोनइल साईटच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून घ्यायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर त्या तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करायचा. एवढंच नव्हे तर तो तरूण त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा. अखेर त्या काश्मिरी तरुणाला काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणावर यापूर्वी दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ आणि इंदूरमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत एका तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमन वर्मा मूळचा जम्मू काश्मीरमधील आहे. त्याने एका संकेतस्थळावर बनावट आयडी तयार करून नोंदणी केली होती. या माध्यमातून तो तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत होता.त्याने हडपसरमधील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मैत्री केली. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तसेच, त्या तरुणीकडून ऑनलाइन 45 लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्न न करता तरुणीची फसवणूक करून तो पसार झाला.

याबाबत तरुणीने तक्रार दिल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तपासादरम्यान तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने अमनला इंदूर परिसरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article