दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सवाला प्रारंभ झाला आहे. X (Twitter)
Published on
:
08 Feb 2025, 6:50 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथे आपला मोठा हादरा बसला असून तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने विधानसभेवर सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.निर्णायक बहुमताकडे पक्षाने वाटचाल सुरु ठेवल्याने दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण, निवडणूक आयोगाच्या #DelhiElectionResults च्या ट्रेंडमध्ये भाजपने दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल केल्याचे स्पष्ट होत आहे.