KALICHARAN MAHARAJ: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या, ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. त्यांचा जे लोक अपमान करतील त्यांची सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटली पाहिजे. काली मातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो. खास करुन ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करुन स्वतःच्या मुंडक्या उतरवा आणि जीव द्या स्वतःचा, यातच हिंदूंच कल्याण आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले.
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची…
बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदूवादी आहेत. त्यांचा वारस तोच असावा, जो कट्टर हिंदूवादी आहे. एकनाथ शिंदे साहेब कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, तेच बाळासाहेबांचे वारस आहेत, असे मला वाटते. कोणताही पक्ष विचारांवर चालत असतो. शिवसेनेचा विचार कट्टर हिंदुत्व आहे. हिंदू राष्ट्र आहे. शिंदे साहेब त्याचे प्रतिनिधी आहेत, हे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.
वक्त बोर्डासंदर्भात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, हिंदूंसाठी सनातन धर्माची स्थापना झाली पाहिजे. ज्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत त्या हिंदू मालकांना मिळाल्या पाहिजेत. ज्याचे मालक अस्तित्वात नाही त्यांच्या जमिनी सनातन धर्माकडे दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांचा उपयोग हिंदूंच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
तंत्र-मंत्र असतो…
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासंदर्भात वक्तव्य केले. त्याठिकाणी काळी जादू असल्याचे ते म्हणाले होते. त्या वक्तव्यावर बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, प्रत्येकाला आपआपली वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर फडणवीस साहेबांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तंत्र मंत्र असतात जादूटोणा असतात यात काही संशय नाही, असा जर कोणी करत असेल तर त्या त्यांच्या खाजगी गोष्टी आहेत.