घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की शक्यतो त्याचे विधी झाल्यानंतर कोही लोकं त्या व्यक्तीच्या वस्तू पाण्यात वाहून देतात तर काही जण त्या वस्तू त्यांची आठवण म्हणून आपल्या जवळ किंवा घरात ठेवून देतात. पण शास्ज्ञानुसार मृत व्यक्तीच्या वस्तू, त्यांचे कपडे आपल्या जवळ ठेवणे हे चांगले मानले जात नाही.
मृत व्यक्तीच्या वस्तू का वापरू नये?
असं म्हटलं जातं की, मृत व्यक्तीच्या वस्तू किंवा कपड्यांमध्ये त्यांचा सहवास किंवा त्यांची एनर्जी असते. बरं याबाबत जास्त वर्ण करण्यात आलं आहे गरुड पुराणात.
गरुड पुराणानुसार मृत व्यक्तींच्या वस्तू, जसे की कपडे, दागिने, घड्याळ, चप्पल आणि भांडी वापरू नयेत. या वस्तूंमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा असते शिवाय त्या वस्तू वापरल्याने पितृदोष लागतो.
गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, ज्यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे आणि कर्मांच्या परिणामांचे सविस्तर वर्णन केले आहे. तसेच, या पुराणात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या न पाळल्यास वाईट परिणाम होऊ शकतात असं म्हटलं जातं.
त्यापैकी एक म्हणजे मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर करणे. गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीच्या काही वस्तूंचा वापर केल्याने पितृ दोष निर्माण होतो, ज्याचा परिणाम अनेक पिढ्यांपर्यंत होऊ शकतो.
गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तूंचा वापर करू नये?
कपडे : मृत व्यक्तीचे कपडे घालू नयेत. असे मानले जाते की, त्या कपड्यांमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा असते. त्यामुळे त्यांचा वापर केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
दागिने : मृत व्यक्तीचे दागिने परिधान करू नयेत. या दागिन्यांमध्येही मृत व्यक्तीची ऊर्जा असते आणि त्यांचा वापर केल्याने दुर्भाग्य येऊ शकते.
घड्याळ : मृत व्यक्तीचे घड्याळ घालू नये. घड्याळ हे काळाचे प्रतीक आहे आणि त्यात मृत व्यक्तीची ऊर्जा असते. त्यामुळे अशा घड्याळाचा वापर केल्याने जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.
चप्पल किंवा शूज : मृत व्यक्तीचे चप्पल वापरू नयेत. असे मानले जाते की, शूजमध्ये मृत व्यक्तीच्या पायांची धूळ असते आणि त्यांचा वापर केल्याने रोग किंवा आजार उद्भवू शकतात.
भांडी : मृत व्यक्तीची भांडीही वापरू नयेत. असे मानले जाते की, या भांड्यांमध्ये मृत व्यक्तीचे अन्न उरलेले असते आणि त्यांचा वापर केल्याने दुर्भाग्य येऊ शकते.
पितृ दोष आणि त्याचे परिणाम गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर केल्याने पितृ दोष निर्माण होतो. पितृ दोष म्हणजे मृत पूर्वज नाराज होणे आणि त्यांच्या आशीर्वाद न मिळणे.
अनेकदा आपण ऐकलं असेल की अमुक एक व्यक्तीला पितृ दोष सांगितला आहे. तर या पद्धतीनेही पितृ दोष निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात.
दरम्यान पितृ दोष निर्माण झाल्यास आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या किंवा कुटुंबात वाद आणि संघर्ष निर्माण होतात असं म्हटलं जातं. मग प्रश्न पडतो की मृत व्यक्तीच्या वस्तूंचं नेमकं काय करायचं. तर पाहुयात.
मृत व्यक्तीच्या वस्तूंचे काय करावे? गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीच्या वस्तू जाळाव्यात किंवा दान कराव्यात. असे केल्याने पितृ दोष टळतो आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. जर मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर करायचाच असेल, तर सर्वप्रथम त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि पितृ दोषाचा प्रभाव कमी होतो.
तसेच, वापर करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर न करणेच शक्यतो श्रेयस्कर आहे. म्हणून, या वस्तू जाळाव्यात किंवा योग्यरित्या दान कराव्यात, जेणेकरून मृत आत्म्यास शांती लाभेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)