शेअर बाजारात ब्लडबाथ! सेन्सेक्स १८०० अंकानी गडगडला, १० लाख कोटींचा चुराडा

2 hours ago 1

आज गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला.(File photo)

पुढारी वृत्तसेवा

Published on

03 Oct 2024, 8:50 am

Updated on

03 Oct 2024, 8:50 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य पूर्वेतील इराण- इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) हाहाकार उडाला. सेन्सेक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात तब्बल १,८०० अंकांनी कोसळून ८२,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५०० अंकांनी घसरून २५,३०० च्या खाली आला.

गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फटका

बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात एका दिवसात सुमारे १० लाख कोटींची घट झाली आहे. यामुळे बाजार भांडवल ४६४ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

मध्य पूर्वेतील तणावाचे बाजारात पडसाद

इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर १८० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर इस्रायलने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर घेण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धपरिस्थितीमुळे चिंता वाढली. येथे संघर्ष आणखी तीव्र झाल्यास इराणमधून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article