शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत द्या; पीक विमा मंजूर करा:काँग्रेस पक्षाने केली मागणी, राज्यपालांना निवेदन देत केली चर्चा

2 hours ago 1
शेतकऱ्यांना एकरी ५० हजाराची मदत द्या, पीक विमा मंजूर करा, यासह अन्य मागण्यांसाठी कांॅग्रेसने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत चर्चा केली. त्यांना मागण्यांचे निवदेनही सादर करण्यात आले. यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून बाळापूर तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी कि काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार बाळापूर, पातूर, अकोला, तेल्हारासह अन्य तालुक्यात पुढे आला. परिणामी उत्पादनच होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. त्यावेळीही काँग्रेसचे नेते होते. दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेल्या रज्यपालक सी.पी. राधाकृष्णन यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेत निवेदन सादर केले. ५ लाख एकरावरील पिकांचे नुकसान ः जिल्ह्यातील खरीप हंगाम सततच्या पावसामुळे अंदाजे ५ लाख लाख एकर सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे, असे कांॅग्रेसने निवेदनात नमूद केले. सततच्या पावसामुळे शेतामध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाहीत तसेच कपाशीच्या झाडाची वाढ झाली नाही. शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे पिके करपून गेली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. सरकारचे लक्ष वेधण्याकरता अन्नत्याग सत्याग्रह केला. मात्र शासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळला नाही. ...तर शेतकरी आत्महत्या वाढतील सततच्या पावसामुळे पंचनामे करण्याची परवानगी शासनाकडे मागण्यात आली नाही. मात्र अद्यापही परवानगी मिळालेली नाही. शेतकऱ्याचे जर वर्षाचे पीक बुडाले तर त्यांना कोणताही आधार उरत नाही. या परिस्थितीत जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढू शकतात. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article