श्रीरामपूर विधानसभा मतदरसंघामध्ये ३११ मतदान केंद्रावर होणार मतदान:मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ८६६ मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी तैनात
3 days ago
1
श्रीरामपूर मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी, २० रोजी श्रीरामपूर विधानसभा मतदरसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतदारसंघात ३११ मतदार संघ असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह एक पोलिस व इतर सहायक असे सहा कर्मचारी असे एकूण १ हजार ८६६ याशिवाय १५५ मतदान अधिकारी व कर्मचारी राखीव आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ५३ हजार ३७९ मतदार, तर स्त्री १ लाख ५३ हजार ३७९, तृतीय पंथी ६३, दिव्यांग २ हजार ८३ असे एकूण ३ लाख ९ हजार १५१ मतदार आहेत. आज, १९ रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे. मतदान साहित्य वाटप व जमा करण्यासाठी ३१ टेबलचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक टेबलवर दहा मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करणे व जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे अत्यंत कमी वेळेत साहित्य देवघेव प्रक्रिया पार पडणार आहे. २८ क्षेत्रीय अधिकारी व १ हजार ७१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान निर्भयपणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीरामपूर मतदार संघात ३११ मतदान केंद्र असून १५६ मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शिवाय १५ केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्त केलेली आहे. तीन आदर्श, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र मतदान केंद्रात तीन आदर्श, एक युवा, एक दिव्यांग मतदान केंद्र आहेत. सेंट झेविअर स्कूल, निपाणी वडगाव भास्करराव गलांडे पा. विद्यालय अशोकनगर, यशवंत विद्यालय पढेगाव या तीन ठिकाणी आदर्श मतदान केंद्र, लोकमान्य टिळक वाचनालय आगाशे हॉल येथे पूर्ण महिला कर्मचारी, डी. डी. काचोळे विद्यालयात खोली क्रमांक ४ पूर्ण तरुण कर्मचारी, पटेल विद्यालयात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)