श्रेयवादावरुन आजी व माजी खासदारांत जुंपली:ए खाली बस, संजय पाटील यांनी विशाल पाटलांचा केला एकेरी उल्लेख

2 hours ago 1
सांगलीच्या आजी व माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले. खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात कडाक्याचे वाद झाल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे नगरपालिकेच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभावेळी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील हे श्रेयवादावरुन व्यासपीठावरच भिडले. यावेळी माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ए बस खाली, असे म्हणाले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे नगपालिकेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी रिंगरोडच्या श्रेयवादावरून माजी खासदार संजय पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात वादावादी झाली. विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात रिंगरोडचे श्रेय रोहित पाटील यांना दिले. यामुळे संजय पाटील यांनी विशाल पाटील यांना मध्येच थांबवले. विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात, अशी टीका देखील केली. संजय पाटलांकडून विशाल पाटलांचा एकेरी उल्लेख विशाल पाटील यांनी रिंग रोडच्या श्रेयवादाचा मुद्दा आजच्या कार्यक्रमात पुन्हा मांडल्याने संजय पाटील चांगलेच भडकल्याचे दिसले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावदी झाली. यावेळी विशाल पाटील यांनी संजय पाटलांना थांबवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. पण संजय पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना ओरडत ए बस खाली, असे म्हटले. श्रेयवादाचा मुद्दा काय‌? तीन दिवसांपूर्वी विट्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी 173 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती .या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला होता. विशाल पाटील यांनी हाच मुद्दा आजच्या कार्यक्रमात मांडल्यामुळे माजी खासदार संजय पाटील भडकल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा... राहुल गांधींनी कशी केली हरभऱ्याची भाजी?:पाहा VIDEO; शाहू पाटोळेंशी चर्चा; म्हणाले - दलित काय खातात हे कुणालाच माहिती नाही काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी कोल्हापूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी सनदे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. राहुल यांनी या घटनाक्रमाचा एक व्हिडिओ सोमवारी ट्विट केला. या व्हिडिओत ते दलित सामाजिक कार्यकर्ते शाहू पाटोळे यांच्याशी संवाद साधत दलितांच्या खाणपाणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दलित काय खातात हे कुणालाच माहिती नाही, असे प्रांजळ मत व्यक्त केले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article